फॉरेन्सिक लॅबरोटरीद्वारे न्यायालयात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:43 IST2017-09-27T20:39:31+5:302017-09-27T20:43:48+5:30
खून, बलात्कार यासारख्या क्लिष्ट गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक तपासणी व तपासणीस यांची भूमिका महत्त्वाची ठरते़ न्यायालयातील गुन्ह्यांसाठी साक्ष देण्यासाठी नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू करण्यात आले

फॉरेन्सिक लॅबरोटरीद्वारे न्यायालयात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष
नाशिक : न्यायालयातील साक्ष म्हटली कि साक्षीदाराला सकाळी अकरा वाजता हजर रहावेच लागते़ न्यायालयात दिवसभरात खटल्याचा पुकारा जेव्हा होईल त्यावेळी साक्ष घेतली जाते, तर कधी कामाचा व्यापामुळे साक्ष न होता पुढील तारीखही दिली जाते़ त्यातच खून, बलात्कार यासारख्या क्लिष्ट गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक तपासणी व तपासणीस यांची भूमिका महत्त्वाची ठरते़ न्यायालयातील गुन्ह्यांसाठी साक्ष देण्यासाठी नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू करण्यात आले असून याद्वारे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जिल्हा न्यायालयात प्रथम साक्ष घेण्यात आली आहे़ राज्यातील साक्ष घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे़
न्यायालयात सुरू असलेल्या क्लिष्ट फौजदारी खटल्यांमध्ये फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा तपासणी अहवाल महत्वाचा पुरावा ठरतो़ वैज्ञानिक पुरावे गोळा करणारे कर्मचारी व तपासणीस यांच्यावरच गुन्हेगाराची शिक्षा अवलंबून असते़ यामुळे संबंधित व्यक्तीस न्यायालयात साक्षीसाठी हजर रहावे लागते़ मात्र यासाठी त्याला आपले काम सोडून वेळ व पैसा असे दोन्ही खर्च करावे लागतात़ नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये व्हीडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली असून सहायक रासायनिक विश्लेषक वैशाली महाजन यांनी २३ आॅगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जिल्हा न्यायालयात डीएनए चाचणीसंदर्भात आपली साक्ष नोंदविली़ याप्रकारे न्यायालयात साक्ष नोंदविण्याची संधी वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या इतिहासात प्रथमच नाशिकच्या प्रयोगशाळेला मिळाली आहे़
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत दाखल होणाºया प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे़ त्यातच शासकीय अधिकाºयांच्या बदल्या झाल्यानंतर बहुतांशी प्रकरणे सुनावणीसाठी येतात़ त्यामुळे या अधिकाºयांना आपली कामे सोडून साक्षीसाठी न्यायालयात हजर राहावे लागते यामध्ये त्यांचा वेळ व पैसा यांचा अपव्यय तर होतोच शिवाय कामावरही परिणाम होतो़ मात्र, आता या सुविधेचा न्यायालयांनी वापर केल्यास या अधिकाºयांचा वेळही वाचणार आहे़ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा हा पर्याय नाशिक विभागातील न्यायालयांमध्ये राबविता येणेही शक्य आहे़