सायगावला सरकारविरोधात निषेध सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:11 IST2018-07-26T00:10:59+5:302018-07-26T00:11:16+5:30
तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांवर आंदोलक कार्यकर्त्यांनी घणाघाती हल्ला करत निषेध व्यक्त केला.

सायगावला सरकारविरोधात निषेध सभा
येवला : तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांवर आंदोलक कार्यकर्त्यांनी घणाघाती हल्ला करत निषेध व्यक्त केला. औरंगाबाद येथील आंदोलनदरम्यान जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बुधवारी सकाळी ८ वाजता येथील रोकडोबा पारावर शेकडो आंदोलक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मराठा समाजाला तत्काळ शासनाने आरक्षण जाहीर करावे, अशी एकमुखी मागणी केली. याप्रसंगी शेकडो आंदोलकांनी गावातून घोषणा देत रॅली काढली. यावेळी सुनील देशमुख, अरविंद उशीर, विजय उशीर, मयूर खैरनार, तान्हाजी बारे, महेश उशीर, हर्षल देशमुख, बशीरभाई शेख, एकनाथ भालेराव, संजय देशमुख, चिंधू ढाकणे, भाऊसाहेब रोकडे, बबन ढाकणे, पोपट वालतुरे, जालिंदर जठार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
निषेध सभेत येवला तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर, प्रा. शिवाजी भालेराव, भारिप बहुजन महासंघाचे येवला तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे, गणपत खैरनार, अॅड. राहुल भालेराव, सोसायटी चेअरमन गणपत उशीर, विलास भालेराव, दिनेश खैरनार, शरद लोहकरे, संजय पेंढारी आदींची भाषणे झाली.