केरळ सरकारचा प्राणिप्रेमींकडून निषेध

By Admin | Updated: July 27, 2015 00:08 IST2015-07-27T00:07:49+5:302015-07-27T00:08:05+5:30

केरळ सरकारचा प्राणिप्रेमींकडून निषेध

Prohibition of Kerala government's protests | केरळ सरकारचा प्राणिप्रेमींकडून निषेध

केरळ सरकारचा प्राणिप्रेमींकडून निषेध

नाशिक : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी केरळ सरकारने कुत्र्यांची थेट हत्त्या करण्याच्या उचललेल्या क्रू र पावलाच्या निषेधार्थ शहरातील प्राणिप्रेमींनी एकत्र येत रविवारी (दि. २६) मोर्चा काढला होता.
केरळ सरकरने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी क्रुरपणे हत्त्या करण्याचा अघोरी निर्णय घेतला आहे. केरळ सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या भटक्या श्वानांची हत्त्या थांबवावी, या मागणीसाठी शहरातील प्राणिप्रेमी संस्था रस्त्यावर उतरल्या होत्या. सकाळी कॉलेजरोड परिसरात मोर्चा काढून प्राणिप्रेमींनी केरळ सरकारचा निषेध नोंदविला.
इंग्रजी घोेषवाक्याचे फलक हातात घेऊन प्राणिप्रेमींनी केरळ सरकारचा निषेध नोंदविला. या मोर्चामध्ये शरण ट्रस्ट, अ‍ॅनिमल वेल्फेअर अ‍ॅण्ड अ‍ॅन्टी हॅरेसमेंट सोसायटी, मानव उत्थान मंच या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता.

Web Title: Prohibition of Kerala government's protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.