एकलहरे केंद्रातील वीज निर्मिती संच बंदचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:15 IST2018-04-29T00:15:50+5:302018-04-29T00:15:50+5:30
राज्य शासनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

एकलहरे केंद्रातील वीज निर्मिती संच बंदचा निषेध
एकलहरे : राज्य शासनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी मुंबई येथे राज्याचे ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव व महानिर्मिती व महावितरण यांच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे. शासनाने खासगीकरण धोरणाचा अवलंब न करता चांगल्या स्थितीत असलेला वीज संच सुरूच ठेवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर कामगार संघटनांचे राज्यस्तरीय नेते कृष्णा भोसर, शंकर पहाडे, आर. टी. देवकांत, सुनील जगताप, सय्यद जहिरोद्दीन, हिंदुराव पाटील, एन. बी. जारोंडे आदींंच्या सह्या आहेत. दरम्यान गुरुवारी तिसऱ्या दिवशी एकलहरे येथे झालेल्या द्वारसभेत कामगार नेते ज्ञानेश्वर डोंगरे, सीताराम चव्हाण, विठ्ठल बागल, एस. डी. गावंड आदींनी वीज संघटनांच्या राज्यस्तरीय पदाधिकाºयांनी दिलेल्या निवेदनाची माहिती दिली. यावेळी घोषणा देत राज्य शासन व महावितरण, महानिर्मिती कंपनीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.