साईमंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
By Admin | Updated: August 21, 2015 23:50 IST2015-08-21T23:49:50+5:302015-08-21T23:50:15+5:30
साईमंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

साईमंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
सिडको : येथील एकता वृक्ष संवर्धन व सामाजिक, शैक्षणिक मंडलाच्या वतीने श्री समर्थ साईनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व वर्धापन दिनानिमित्त दररोज अखंड हरिनाम नामस्मरण जप यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिडकोतील पंडितनगर येथील साईमंदिरात वर्धापन दिनानिमित्त २४ तास अखंड नामस्मरण, दर १८ वर्षांनी येणाऱ्या कोकिळाव्रत ग्रंथ पारायणाचे वाचन विशाल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच साई सच्चरीत ग्रंथाचा पारायण सोहळा, हरिपाठ, अखंड हरिनाम सप्ताह आदि कार्यक्रमांबरोबरच श्री समर्थ साईनाथ महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक, काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले
आहे. (वार्ताहर)