भगवान विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:32 IST2018-09-16T00:32:17+5:302018-09-16T00:32:55+5:30
भगवान श्री विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त सोमवारी (दि. १७) महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या संस्थेच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त कार्यक्रम
नाशिक : भगवान श्री विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त सोमवारी (दि. १७) महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या संस्थेच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त सत्यनारायण पूजा, सर्वसाधारण सभा, महाआरती, मान्यवरांचे स्वागत आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, अखिल महाराष्ट्र सुतार-लोहार संघाचे प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, उद्योजक गुरुदेवसिंग बिरदी, उद्योजक नारायण क्षीरसागर, मोहनलाल शर्मा, किरण कुवर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष नाना खैरनार, खेताराम सुतार, रमेश गाडेकर, अमरचंद शर्मा, लक्ष्मीनारायण जांगिड, ओमजी जांगिड, लालबहादूर विश्वकर्मा व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.