कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतीच्या बांधावर कार्यक्रम - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:45+5:302021-06-23T04:10:45+5:30
जळगाव नेऊर येथे तांबे वस्तीवर पाटोदा मंडळाचे कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडी यांनी शेतकऱ्यांना पेरणी करताना शक्यतो बीबीएफ यंत्राने म्हणजेच ...

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतीच्या बांधावर कार्यक्रम - A
जळगाव नेऊर येथे तांबे वस्तीवर पाटोदा मंडळाचे कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडी यांनी शेतकऱ्यांना पेरणी करताना शक्यतो बीबीएफ यंत्राने म्हणजेच रुंद सरी वरंबा तंत्राचाच वापर करावा, त्याचबरोबर बीबीएफ यंत्र पेरणीसाठी कसे फायदेशीर आहे, हे शेतकऱ्यांना पटवून सांगितले. त्यामध्ये यंत्राचा वापर केल्याने योग्य प्रमाणात बियाणाची पेरणी होते. अतिरिक्त जास्त पाऊस झाल्याने जास्तीचे पाणी सरीद्वारे बाहेर जाते. कृषी सहायक रमेश वाडेकर यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियाचे महत्त्व, पिकांसाठी खतांचा संतुलित वापर, प्रमुख पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत युनिट, नाडेप युनिट याविषयी मार्गदर्शन केले.
राहुल जगताप, कृषी सहायक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी सरपंच विकास गायकवाड, कृषीमित्र आबासाहेब घुले, नामदेव गायकवाड, विक्रम गायकवाड, विठ्ठल गायकवाड, मच्छिंद्र घुले, देवीदास घुले, मनोहर तांबे, दिनकर गायकवाड, सोपान घुले, सोपान तांबे, किरण गीते, तुकाराम गायकवाड, संदीप गायकवाड, अतुल गायकवाड, नितीन गायकवाड, संदीप तांबे, सोमनाथ दाते, पुंडलिक गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, बाबासाहेब घुले, नीलेश गायकवाड, सचिन घुले, सर्जेराव सोनवणे, श्याम शिंदे, सुधाकर घुले, वसंत तांबे, अशोक तांबे, वाळुबा सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते.
फोटो - २१ जळगावनेऊर १
जळगाव नेऊर येथे कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडी, कृषी सहायक राहुल जगताप व रमेश वाडेकर आणि शेतकरी.
===Photopath===
210621\424621nsk_24_21062021_13.jpg
===Caption===
जळगाव नेऊर येथे कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडी, कृषी सहाय्यक राहुल जगताप व रमेश वाडेकर आणि शेतकरी.