व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘देवबाभळी’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:42 IST2018-05-04T00:42:14+5:302018-05-04T00:42:14+5:30

नाशिक : महाराष्टÑ राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘देवबाभळी’ नाटकाने बाजी मारली आहे. त्याला साडेसात लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

In the professional theatrical competition, 'Devbabali' first | व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘देवबाभळी’ प्रथम

व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘देवबाभळी’ प्रथम

नाशिक : महाराष्टÑ राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘देवबाभळी’ नाटकाने बाजी मारली आहे. त्याला साडेसात लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही घोषणा केली. या स्पर्धेत ‘अनन्या’ नाटकाने द्वितीय तर ‘वेलकम जिंदगी’ने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. या नाटकांना अनुक्रमे साडेचार व तीन लाखांचा पुरस्कार प्राप्त झाला. या स्पर्धेत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक प्रताप फड यांना, प्राजक्त देशमुख यांना द्वितीय तर स्वप्नील बारस्कर यांना तृतीय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक राहुल शिरसाठ, सिद्धार्थ बोडके, अतुल पेठे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सोनाली मगर, शुभांगी सदावर्ते, अतिशा नाईक, ऋतुजा बागवे, शिवानी रांगोळे यांना जाहीर करण्यात आले.

Web Title: In the professional theatrical competition, 'Devbabali' first

टॅग्स :Nashikनाशिक