व्यावसायिक नाटकांना नाशिककर मुकणार
By Admin | Updated: June 9, 2017 01:28 IST2017-06-09T01:27:56+5:302017-06-09T01:28:16+5:30
वर्षभर ‘कालिदास’ बंद : गायकवाड सभागृह, प. सा. नाट्यगृहात तांत्रिक अडचणींचा डोंगर

व्यावसायिक नाटकांना नाशिककर मुकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण होणार असल्याने जुलैपासून वर्षभर नाट्यगृह बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिक नाटकांसह नामवंत कलावंतांच्या सांगीतिक मैफलींसाठी लागणारी व्यवस्था पर्यायी असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृह आणि सावानाच्या प. सा. नाट्यगृहात उपलब्ध नसल्याने नाशिककर नाट्यरसिकांची परवड होणार आहे.
महापालिकेने कालिदासच्या उभारणीनंतर तीस वर्षांनी पहिल्यांदाच नूतनीकरणाचे मोठ्या प्रमाणावर काम काढले आहे. त्यासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. साधारणपणे, जुलै २०१७ पासून वर्षभर कालिदास कलामंदिर नूतनीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदचा सर्वाधिक फटका व्यावसायिक नाटके व मोठ्या सांगीतिक मैफलींना बसणार आहे. महापालिकेने कालिदास बंद काळात पर्यायी व्यवस्था म्हणून दादासाहेब गायकवाड सभागृहाची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, गायकवाड सभागृहात