शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मालेगाव तालुक्यात काश्मिरी सफरचंदाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:47 IST

मालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.

ठळक मुद्देखजुराचीही केली लागवड : आघार येथे शेतकरी हिरामण मानकर यांचा प्रयोग

शफीक शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.आघार शिवारात शिवराम बापू मानकर (८२) यांची अवघी सहा एकर जमीन. त्यांचे चिरंजीव हिरामण मानकर हे चांदवड येथे गटविकास अधिकारी होते.सेवानिवृत्त झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीत शेती करायचे त्यांनी ठरवले. मात्र पारंपरिक शेतीत त्यांना रस नव्हता. काही तरी वेगळे करण्याची जिद्द मनात होती. शेतात डाळिंब पीक त्यांनी घेतले होते मात्र तेल्या रोगाने डाळिंबबागा उद्ध्वस्त होत असल्याने त्यांनी नवीन पिकाचा शोध सुरू केला. यू-ट्यूबवर अभ्यास सुरू केला. उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची जात विकसित केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. एचआरएमआयवाय ही उन्हाळ्यात ४५ ते ४८ अंश तपमानात टिकून राहणारी सफरचंदाची जात असल्याने तिची लागवड करण्याचा निर्धार त्यांनी केला. हिमाचल प्रदेशात पनयाला, जि. बिलासपूर येथील हरिमन शर्मा यांनी ही जात १९९९ मध्ये विकसित केल्याचे हिरामण मानकर यांना कळाले. आॅक्टोबर २०१९ मध्ये ही माहिती मिळाली. तत्कालीन राष्ट्रपती अबुल कलाम यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनात ३५ रोपे शर्मा यांनी लावली होती. एकेका रोपाला ३५० सफरचंदाची फळे लागली होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मानकर यांना अहमदाबादच्या नॅशनल इन्व्होवेशन फाउण्डेशन यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. आॅक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी रोपांची बुकिंग केली. दीड एकरात मानकर यांनी ३१५ सफरचंदाच्या रोपाची लागवड केली. वर्षभरात सुमारे पाच फूट झाड वाढते. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान पानगळ होते आणि फेब्रुवारीत झाडांना फुले येतात. जूनमध्ये फळे परिपक्व होतात. फळांना शंभर रुपये किलो दर मिळतो त्यामुळे ही परवडणारी शेती असल्याचे मानकर यांनी सांगितले.खजुराची लागवडमानकर यांनी एका एकरात बदई जातीच्या खजूर पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे तिसऱ्या वर्षी फळ लागते. चौथ्या वर्षांपासून एकेका झाडाला दोन क्विंंटल माल येतो. ओली खजूर विकली तरी दहा लाखांचे उत्पन्न येते. यालादेखील फारसा खर्च येत नाही.सफरचंदासाठी खडकाळ पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. पिकाला पाणी कमी लागते. यामुळे मानकर यांनी ठिबक सिंचन करून घेतले आहे. त्यासाठी त्यांना दहा हजार, तर कुरिअरने रोपे मागवण्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी