येवल्यात संत सावता महाराज प्रतिमेची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:11 IST2018-08-10T18:09:14+5:302018-08-10T18:11:01+5:30
येवला : येवल्यात संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. माळी समाजात जन्माला आलेल्या सावता माळी महाराजांना बालपणापासून भगवतभक्तीची ओढ होती. परंपरागत व्यवसाय सांभाळून ते भक्तीत तल्लीन होत. कर्म हाच माझा परमेश्वर, हा मोलाचा विचार त्यांनी आपल्या अभंगरचनांमधून जनतेपुढे मांडला. ‘कांदा, मुळा, भाजी,अवघी विठाई माझी, लसून, मिरची, कोथिंबिरी अवघा भरला माझा हरी’ .. या अभंगातून त्यांनी कर्माबाबत सुरेख विवेचन केले आहे.

दत्तवाडी येथील समाज मंदिरात सकाळी सावता माळी यांच्या मूर्तीस स्नान घालून पूजा करण्यात आली. यावेळी आकर्षक सजविलेल्या रथांत संत सावता महाराजांची प्रतिमा ठेवण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. याप्रसंगी दत्तवाडी येथून सावता महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दत्तवाडी, पानमळा, शनि पटांगण, बुरु ड गल्ली यामार्गे सावता महाराज यांची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. दत्तवाडी या ठिकाणी पालखी मिरवणूक सांगता होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सावता मंडळ, जय जनार्दन मंडळ, नवनाथ मित्रमंडळ, एकता मित्रमंडळ, न्यू सावता मित्रमंडळ, ओम कलहार मित्रमंडळ,सावता महाराज उत्सव समिती आदींनी परिश्रम घेतले.