पर्युषण महापर्वानिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:58 IST2018-09-15T00:58:04+5:302018-09-15T00:58:12+5:30
जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन धर्मातील साधू-साध्वीसह साधक सहभागी झाले होते.

पर्युषण महापर्वानिमित्त मिरवणूक
नाशिक : जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन धर्मातील साधू-साध्वीसह साधक सहभागी झाले होते.
येथील श्री चिंतामणी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या पर्युषण महापर्वानिमित्त श्रीमद्विजय पुण्यपाल सुरिश्वरजी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांचे शिष्यरत्न प.पू. मुनिराज श्री मुक्तिभूषण विजयजी आणि प.पू. मुनिराज श्री मैत्रीभूषण विजयजी हे नाशिक येथील पिता-पुत्र दीक्षित झालेले असून, चर्तुमास करण्याकरिता नाशिक येथे आलेले आहेत. त्यांच्या व्याख्यानाने प्रेरित होऊन संघात अनेक धार्मिक कार्यक्रम झाले.
पर्युषण महापर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची मिरवणूक राका कॉलनी शरणपूररोड मार्गे काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल पथक, बॅण्ड पथकासह घोड्याच्या बग्गीमधून तसेच सजविलेल्या वाहनांमधून तप करणाºयांची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत दीप शहा, नीरज शहा, जिया शहा, युतिका शहा, मोक्षा शहा, श्रुती शहा, प्रथम शहा, तेजल संचेती, आर्चि पटवा, महक पटवा, रितीका पटवा, अंकिता पटवा, सिल्केशा कोठारी, नीलेश कोठारी, अक्षय शहा, अरुषा शहा, दर्शन शहा, दीशा शहा, संगीता बोथरा आदी सहभागी झाले होते.
जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व म्हणजे पर्युषण महापर्व हे आहे. त्या पर्वानिमित्ताने व गुरुमहाराजांच्या आशीर्वादाने संघातील अनेक भक्तांनी १६, १० उपवास केले तर ४० भक्तांनी आठ दिवस उपवास केले. १०० भक्तांनी तीन दिवसांचे उपवास केले.