शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

निमंत्रणाच्या अक्षता कलशांची शोभायात्रा; प्रभू रामललाच्या वेषेत बालके

By suyog.joshi | Updated: December 16, 2023 17:57 IST

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथून अभिमंत्रित करून मिळालेल्या निमंत्रणाच्या अक्षतांच्या कलशांचे पूजन शनिवारी करण्यात आले.

नाशिक : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथून अभिमंत्रित करून मिळालेल्या निमंत्रणाच्या अक्षतांच्या कलशांचे पूजन शनिवारी (दि. १६) रामकुंड, पंचवटी येथे विविध साधुसंत, कारसेवक यांच्या उपस्थितीत तीर्थ पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत सेवाश्रम संघाचे स्वामी परिपूर्णानंद, दिगंबर आखाड्याचे श्रीमंत राम किशोरदास शास्त्री, स्वामी नारायण मंदिर अक्षरधाम मठाचे महाव्रत स्वामी, गोपीनाथ गौडीय मठाचे आचार्य, अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रीय संघटनमंत्री श्रीरंग जी राजे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्माचार्य संपर्कप्रमुख माधवदास राठी, शहरातील सनातन धर्म संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, शहरातील एकूण ३१ वेगवेगळ्या ज्ञानी संस्थांचे प्रमुख, कविता राऊत, रोहिदास मडके, ॲड. विक्रांत गांगुर्डे, सुनील गवांदे, डॉ. बैरागी, राजाभाऊ गायकवाड, विलास पांजगे, विशाल बागडी, मांडले, सचिन परमार, शैलेश देवी, रवींद्र खत्री, राजेश भोरे, दुधिदास रामजी मारू, युवराज सैंदाणे, बाबा रणजीत सिंह, हिरामण नांदगावकर, डॉ. भास्कर म्हरसाळे, अमोल पगारे, दिलीप कोठावदे, अभय ताठे, छोटू जैन, आबा पाटकर, नितीन कानडे, राज पानसरे, कैलास वराडे यांच्या हस्ते कलशांचे पूजन करण्यात आले. या पूजेचे पौरोहित्य पुरोहित संघ व सनातन संस्था यांच्यामार्फत करण्यात आले. रामाच्या वेषेत बालकेशोभायात्रेचा मार्ग रामकुंड, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, नाथ लेन, शिवाजी चौक, गजानन चौक, नाग चौक, ढिकलेनगर, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे समारोप करण्यात आला, त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. यात कलशधारी महिला, राम मूर्तीची पालखी, नाम संकीर्तन, राम तांडव, लेझीम पथक, ढोल पथक, रामाच्या वेशभूषेतील लहान मुले सहभागी झाले होते, यावेळी महर्षी गौतम गोदावरी पाठशाला, इस्कॉन, गजानन महाराज भक्त परिवार, गोंदवलेकर महाराज भक्तपरिवार, गौडीय मठ, धर्मसभा तसेच संस्थांचे, मंदिरांचे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रथयात्रा नियोजनमध्ये विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री योगेश बहाळकर, विभाग मंत्री अनिल चांदवडकर व यात्रा समिती म्हणून महेश महंकाळे, अमृत सदावर्ते, चंद्रशेखर जोशी, वृषाली घोलप, सुचिता भानुवंशी यानी कामं पहिले. 

टॅग्स :Nashikनाशिक