नाशिकरोड : परिसरात व आजूबाजूच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी बैलांची विधीवत पूजा करून नैवेद्य दाखवून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.नाशिकरोडच्या मळे परिसरात व आजूबाजूच्या ग्रामीण भागांमध्ये शेतकरी बांधवांनी पोळा सणानिमित्त गुरुवारी सकाळी बैलांना अंघोळ घालून सजवून विधीवत पूजा करत पूरणपोळीचा नैवेद्य दाखविला. सायंकाळी सजविलेल्या बैलांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी नेले होते. तसेच घराघरांमध्ये गृहिणीवर्गाने मातीच्या बैलांची परंपरेप्रमाणे पूजा केली. देवळालीगावातील मारुती ंमंदिर येते बैलांना आणण्यात आले होते. येथे महिलांनी बैलांचे पूजन केले. (प्रतिनिधी)
कारागृहातही निघाली बैलांची मिरवणूक
By admin | Updated: September 2, 2016 00:41 IST