स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू

By Admin | Updated: July 8, 2017 00:34 IST2017-07-08T00:33:54+5:302017-07-08T00:34:09+5:30

नाशिक : महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची निवड करण्याच्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला आहे.

The process of accepting the accepted member is continued | स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू

स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची निवड करण्याच्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून, येत्या मंगळवारी (दि.११) आयुक्तांनी गटनेत्यांसह सभागृहनेते व विरोधी पक्षनेते यांची बैठक बोलाविली आहे. बैठकीनंतर पुढील सप्ताहात इच्छुकांकडून अर्ज मागविले जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ६६ जागा जिंकत बहुमत संपादन केले, तर शिवसेनेला ३५ जागांवर समाधान मानावे लागले. महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्त केले जातात. त्यामुळे तौलनिक संख्याबळानुसार, भाजपाचे तीन तर शिवसेनेचे दोन सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होणार आहेत.

Web Title: The process of accepting the accepted member is continued