शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आधारच्या नोंदणीत राज्यातच अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 6:42 PM

गेल्या ११ जानेवारीपासून संपुर्ण महाराष्टÑात नवीन आधार नोंदणीचे तसेच आधार मधील माहिती अद्यावत करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आधार नोंदणीच्या कामात दिवसाच्या शेवटी युआयडीच्या सर्व्हरवर पॉकेट अपलोड करण्याचे काम केले जाते.

ठळक मुद्देमहाआॅनलाईनची तक्रार : प्रधान सचिवांना पत्र युआयडीचा सर्व्हर बंद असल्यामुळे पुर्णपणे काम थांबले

नाशिक : केंद्र व राज्य सरकार एकीकडे सर्वच शासकीय व निमशासकीय कामकाजासाठी नागरिकांना आधार अनिवार्य करीत असतांना दुसरीकडे शासनाकडूनच आधारचे अपडेशन करण्यासाठी येणाºया तांत्रिक अडचणी दूर करण्यात दुर्लक्ष केले जात आहे. युआयडीने सदरच्या कामासाठी महाआॅनलाईनची नेमणूक केली असली तरी, युआयडीचे सर्व्हर धिम्या गतीने काम करीत असल्याने गेल्या काही दिवसांपासून आधारचे कामकाज थांबल्याची तक्रार महाआॅनलाईनने राज्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.या संदर्भात दिलेल्या पत्रात महाआॅनलाईनने म्हटले आहे की, गेल्या ११ जानेवारीपासून संपुर्ण महाराष्टÑात नवीन आधार नोंदणीचे तसेच आधार मधील माहिती अद्यावत करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आधार नोंदणीच्या कामात दिवसाच्या शेवटी युआयडीच्या सर्व्हरवर पॉकेट अपलोड करण्याचे काम केले जाते. त्यानंतर युआयडीकडून आधार नोंदणी होऊन नागरिकांना आधार क्रमांक दिला जातो. पॉकेट अपलोड करायचे काम ११ जानेवारी पासून युआयडीचा एसएफटीपी सर्व्हर बंद असल्यामुळे पुर्णपणे थांबले आहे. दि. १६ जानेवारी पर्यंत हे काम पुर्णपणे बंद होते १७ जानेवारीपासून हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू झाले आहे. यासाठी युआयडीने सुचविलेल्या उपाययोजना अतिशय किचकट असल्यामुळे हे काम सुरू होण्यास वेळ लागत आहे. याच बरोबर पोर्टल युआयडी गर्व्हमेंट हे अतिशय महत्वाचे पोर्टल जे नवीन आधार नोंदणी करण्याचे काम करते ते गेल्या दोन आठवड्यापासून पुर्णपणे बंद आहे व या संदर्भात युआयडीए कडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात ५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत युआयडीएने मान्य केलेले ७६६ आॅपरेटर सक्रीय करण्याचे काम अजुनही युआयडीएकडे प्रलंबीत आहे व ही प्रलंबीत आॅपरेटरची संख्या आता ८१६ इतकी आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे शासन मान्यताप्राप्त आधार केंद्र आहेत परंतु युआयडीए मात्र ते मान्य करण्यास तयार नसल्याचेही महाआॅनलाईनने तक्रारीत म्हटले आहे. युआयडीएकडून कोणतीही कारणमिमांसा न करता अजुनही आॅपरेटर ब्लॅकलिस्ट करण्याचे काम सुरू असून, या सर्व कारणांमुळे आधार नोंदणीचे काम अतिशय संथ गतीने किंवा बंद झाले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक