शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:16 PM

त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.

ठळक मुद्दे तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.

वसंत तिवडेत्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.तेव्हा देखील संपुर्ण तालुक्यात तालुक्यातील मुख्य पिक भात नागली वरई उडीद खुरासणी ही पिके ब-यापैकी शेतकऱ्यांना लाभदायक ठरली. या वर्षी अद्याप ५० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. अद्यापही काम थांबलेले नाही. अजुन पेरणीचे काम बाकी असुन आता तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.येत्या आठ दिवसात संपुर्ण खरीप लागवड पुर्ण होईल. कृषी विभागाच्या आतापर्यंत झालेल्या पेरणी लागवडीचा अहवाल पाहता भात एकुण सर्व साधारण क्षेत्र ९०५१ हेक्टर असून एकुण पेरणी २५४० हेक्टर, नागली सर्वसाधारण क्षेत्र ३०३० हेक्टर. एकुण पेरणी २६० हेक्टर,वरई एकुण सर्वसाधारण क्षेत्र ३५५७ हेक्टर, एकुण पेरणी १८२ हेक्टर. तूर १०१९ (सर्वसाधारण क्षेत्र) एकुण पेरणी ९५ हेक्टर. उडीद सर्वसाधारण क्षेत्र १६४८ हेक्टर. पेरणी ३४०२ हेक्टर. भुईमुग १४२ हेक्टर, खुरसणी ४८६ हेक्टर सोयाबीन ५ हेक्टर. ऊस ३९ हेक्टर अशा प्रकारे पेरणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुबार पेरणीची गरज नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाळी नक्षत्रे सुरु झाल्यानंतर मृग आर्द्रा ही नक्षत्रे कोरडी गेल्या नंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. तत्पुर्वी आर्द्रात एक चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या. नंतर पेरण्या झाल्या नाहीत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ६ जुलै पासुन तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. ९ जुलैपासून पाऊस जो थांबला तो आठदहा दिवस थांबला. पण पेरणी लागवड आज पर्यंत ५० टक्के पुर्ण झाली आहे.आठ दिवसाआधीच पेरण्या १०० टक्के पुर्ण होतील त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वी देखील दुबार पेरणी करावी लागली नाही आणि यावेळेस देखील दुबार पेरणीची आवश्यकता नाही.वेळुंजे ११४५ तर हरसुल ९९७ मिमि पावसाची सरासरी झाली आहे. संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी १२०४ मिमि झाल्यानंतर आता पेरणी लागवड खणणी, आवणीला वेग आला आहे.खणणी, आवणी करीता २०० ते २५० रु पये रोजंदारी मिळते. तर औतकरी यांना ५०० ते ७०० रु पये रोजंदारी दिली जाते. तसेच लवकर कामे आटोपण्याच्या दृष्टीने यांत्रिकी शेती म्हणुन ट्रॅक्टरद्वारे चिखल करणे, आळवट फिरवणे यासाठी ट्रॅक्टरची रोजंदारी चालकासह एका तासाला ८०० ते १००० रु पये मोजावे लागतात. तसेच शेतकºयाला शेतमजुरीसाठी मजुर आणण्यासाठी खाली कोकणात वरती साप्ते कोणे सोमनाथ नगर शिवाजीनगर वेळे वाघेरा गणेशगाव जातेगाव आदी गावांमधुन मजुर उपलब्ध असले तरच मिळतात. त्यांना आणणे व सायंकाळी घरी पोहविणे यासाठीची जबाबदारीही मालक शेतकºयाला घ्यावी लागते. बळीराजाने ताठ मानेने आपला कणा मोडुन देता आपला धीर खचु न देता अशा संकटाशी मुकाबला केला पाहिजे. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर अनेक संकटे येतात. पण तो परत उभा राहतोच ना? तसा शेतकºयाने टोकाचा विचार न करता परत आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे.- सुनील पोरजे,शेतकरी, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर.