किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 08:39 PM2020-12-15T20:39:16+5:302020-12-16T00:48:42+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील अभिरंग कला संस्थेच्यावतीने दीपावली सुटीच्या कालावधीत घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपनगराध्यक्ष माधवी भुजंग यांच्या हस्ते पार पडले.

Prize distribution of the Fort Build Competition | किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Next

मुलांमधील कलागुण जगासमोर आणण्यासाठी अभिरंग बाल कला संस्था चांगले उपक्रम राबवित असते. यामध्ये मुलांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी आपापल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन भुजंग यांनी केले. किल्ले बनवा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यात सहभागी झालेल्या बालगोपाळांनी किल्ल्यांच्या उत्कृष्ट प्रतिकृती तयार केल्या. परीक्षक म्हणून रवींद्र धारणे व संजय कुलकर्णी यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन किल्ल्यांची पाहणी केली. संस्थेचे संचालक अंबादास जोशी, माधव भुजंग, सुधीर शिखरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

Web Title: Prize distribution of the Fort Build Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.