आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने पारितोषिक वितरण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:55 IST2018-10-23T00:55:30+5:302018-10-23T00:55:46+5:30
सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव कालावधीत दांडियाप्रेमींसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पार पडले.

आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने पारितोषिक वितरण समारंभ
पंचवटी : सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव कालावधीत दांडियाप्रेमींसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, नगरसेवक शांता हिरे, रम्मी राजपूत, उमापती ओझा उपस्थित होते. नवरात्रोत्सव कालावधीत मंडळाकडून दांडियाप्रेमींसाठी बेस्ट दांडिया, बेस्ट गरबा, फॅन्सी ड्रेस, ग्रुप डान्स, नृत्य आदींसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख पारितोषिक वाटप करण्यात येऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सतनाम राजपूत यांनी केले.