शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी टाळाटाळ वेतन काढण्यासाठीही खासगी कर्मचारी
By Admin | Updated: January 3, 2015 01:36 IST2015-01-03T01:35:25+5:302015-01-03T01:36:01+5:30
शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी टाळाटाळ वेतन

शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी टाळाटाळ वेतन काढण्यासाठीही खासगी कर्मचारी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन पाच तारखेच्या आत काढण्याचे आदेश असताना प्रत्यक्षात शिक्षकांचे वेतन १५ तारीख उलटूनही वेळेवर होत नसून शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी शालार्थ वेतन प्रणालीचे जे प्रशिक्षण तालुकास्तरावर केंद्रप्रमुखांना दिले गेले, त्यानुसार एकही केंद्रप्रमुख वेतन काढण्याची कार्यवाही करीत नाहीत,असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी ते शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे यांच्याकडे तक्रार करणार असून, मुख्यालयातही शिक्षण विभागात शिक्षकांचे वेतन काढण्याचे काम करणारा कर्मचारी लेखा विभागाचा नसून चक्क एक शिक्षक असल्याची माहिती यानिमित्ताने उघड झाली आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना मुख्यालयात याच कामासाठी नियुक्ती असताना ते मात्र शाळांच्या पट पडताळणी तपासण्याची कार्यवाही करीत असल्याचेही उघड झाले आहे. जिल्हा परिषदेत सुमारे दहा हजारहून अधिक शिक्षक कार्यरत असून, या शिक्षकांचे वेतन आता शालार्थ वेतनप्रणालीने करण्यात येत आहे. या वेतनप्रणालीला लागू करण्यासाठी जिल्'ातील प्रत्येक केंद्रप्रमुखाला त्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र त्यातील बहुतांश केंद्रप्रमुखांनी प्रशिक्षणानुसार शालार्थ वेतनप्रणाली काढण्याची कार्यवाही सुरूच केलेली नसल्याचा थोरेंचा आरोप आहे. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांचे वेतन काढण्याचे कामही लेखा विभागातील कनिष्ठ अथवा वरिष्ठ वेतन लिपीक नव्हे, तर चक्क सोनवणे नामक एक शिक्षक काढत असल्याचे पंढरीनाथ थोरेंनी सांगितले