शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात खासगी कोचिंग क्लासेसही ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 21:28 IST

नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविषयी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देक्लासेस संचालक संघटनेच्या पदाधिकारी बैठकीत निर्णयआवश्यकतेनुसार मोबाइल, इंटरनेटद्वारे करणार मार्गदर्शन

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्व शाळा व खासगी क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, नाशिक शहरासह जिल्हाभरातील खासगी क्लासेसच्या संचालकांनी शासनाच्या आदेशाला प्रतिसाद देत सर्व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१४) झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविषयी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व शाळांसह कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे क्लासेसचालकांनी क्लासेस बंद ठेण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व शिक्षकांनी मोबाइल किंवा इंटरनेटचा वापर करून विद्यार्थ्यांना गरजेनुसार मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष मुकुंद रणाळकर, राज्य मंत्रालयीन समिती प्रमुख यशवंत बोरसे, उपाध्यक्ष अरुण कुशारे, कार्याध्यक्ष वाल्मीक सानप, शिवाजी कांडेकर, सरचिटणीस लोकेश पारख आदी उपस्थित होते.  कोरोनामुळे सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेताच नाशिक जिल्हा खासगी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने तत्काळ बैठक घेऊन ३१ मार्चपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बैठकीला संघटनेने १५ ते २० सदस्य उपस्थित असले तरी अन्य सदस्यांना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सूचित करण्यात आल्याची माहिती  कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली. खासगी कोचिंग क्लासेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला असला तरी परिस्थिती सुधारली तर सामूहिक चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बंदी उठल्यानंतर अतिरिक्त तासिका घेण्याचे नियोजन असल्याचे  सरचिटणीस   लोकेश पारख यांनी सांगितले.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीTeacherशिक्षकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप