शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये खुन्नसवरून कैद्यांनी मध्यरात्री तुरुंगातच केला राडा; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:55 IST

आरोपींच्या टोळक्याने खुन्नस धरून घेराव घालत लाकडी दंडुक्याने मारहाण केली.

नाशिक : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या टोळक्याने एका बंदीवानावर हल्ला चढवून त्यास गंभीर मारहाण केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. ही घटना आठवडाभरापूर्वी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी कैद्याने दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात २०२१ सालापासून न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात असलेला आरोपी संशयित सागर ऊर्फ पंकज बाजिरा  चौधरी (२५, रा. कुसुंबा) यास आरोपी पॉल व त्याचे साथीदार असलेले वाघमारे, दिनेश चव्हाण, लाला, मामा (बंदी असलेला कैदी), वाजीद, महाजन, अमोल, मोहन (कैदी, पूर्ण नाव माहीत नाही) यांनी दहा दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मारहाण केली. तसेच बळजबरीने भत्ता खाऊ घालून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चौधरी याने या प्रकाराबाबत कारागृह अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यामुळे या आरोपींच्या टोळक्याने पुन्हा त्याच्याविरुद्ध खुन्नस धरून घेराव घालत लाकडी दंडुक्याने मारहाण केली. तसेच तीन महिन्यांची ७,५०० रुपयांची मनी ऑर्डरदेखील लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डोके भिंतीवर आपटून फोडलेरुमाल गळ्याभोवती आवळून ओढत त्याचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे याबाबत चौधरी याने तक्रार केली. मात्र, त्याचे काहीही ऐकले नाही. या सर्व त्रासाला कंटाळून चौधरी याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुमाल गळ्याभोवती आवळून ओढत त्याचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे याबाबत चौधरी याने तक्रार केली. मात्र, त्याचे काहीही ऐकले नाही, या सर्व त्रासाला कंटाळून चौधरी याने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी