सासूला मारहाण करणाऱ्या जावयास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:51 IST2020-01-15T01:50:16+5:302020-01-15T01:51:09+5:30
मद्यसेवन करून सासूसह तिच्या बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी जावयाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी चार महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सासूला मारहाण करणाऱ्या जावयास कारावास
नाशिक : मद्यसेवन करून सासूसह तिच्या बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी जावयाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी चार महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मच्छिंद्र दामू घुगे (४२ रा. चंद्रकिरण अपार्टमेंट, विनयनगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने १७ एप्रिल २०१८ रोजी दोघींना मारहाण केली होती. याप्रकरणी कलाबाई माणिक खाडे (६०, रा. तरोडा, ता. नांदगाव) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात खाडेविरुध्द फिर्याद दिली होती.
विनयनगर परिसरात लग्नसोहळा सुरू असताना घुगे याने मद्यसेवन करून मारहाण केली होती. याप्रकरणी मच्छिंद्रविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. शिरीष कडवे यांनी युक्तिवाद केला. कलाबाई यांच्यासह इतर साक्षीदार, पंच तपासण्यात आले.