पाल्यांना नोकरीत प्राधान्य नीलिमा पवार : सभासदांच्या गाठीभेटी घेऊन मार्गदर्शन घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:14 IST2017-09-02T00:14:15+5:302017-09-02T00:14:48+5:30
मविप्र संस्थेत शिक्षण घेणारा विद्यार्थी चांगला घडावा यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करणार आहे. येत्या काळात प्रत्येक सभासदांची भेट घेऊन तक्रारी व सूचना जाणून घेत सभासदांच्या पाल्यांना मविप्रमध्ये नोकरीस प्राधान्य देणार असल्याची घोषणा मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी कळवण येथे आयोजित सभासद आभार मेळाव्यात केली.

पाल्यांना नोकरीत प्राधान्य नीलिमा पवार : सभासदांच्या गाठीभेटी घेऊन मार्गदर्शन घेणार
कळवण : मविप्र संस्थेत शिक्षण घेणारा विद्यार्थी चांगला घडावा यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करणार आहे. येत्या काळात प्रत्येक सभासदांची भेट घेऊन तक्रारी व सूचना जाणून घेत सभासदांच्या पाल्यांना मविप्रमध्ये नोकरीस प्राधान्य देणार असल्याची घोषणा मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी कळवण येथे आयोजित सभासद आभार मेळाव्यात केली.
अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड शशिकांत पवार होते. व्यासपीठावर मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक अशोक पवार, डॉ. प्रशांत देवरे, नाना महाले, माजी आमदार उत्तम भालेराव, दत्तात्रेय पाटील आदी संचालकांसह माजी संचालक रवींद्र देवरे, नारायण हिरे, कळवण नगरपंचायतचे कौतिक पगार, जिल्हा बॅँकेचे संचालक धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मविप्रचे अध्यक्ष शेवाळे, सभापती बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. ढिकले, कळवण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शिंदे, राजेंद्र पवार, तालुका संचालक अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त करून मविप्रची सत्ता पुन्हा प्रगती पॅनलच्या हाती दिल्याने संस्थेची आगामी काळात प्रगती होईल, अशी ग्वाही दिली. पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, संस्थेत चुकीच्या गोष्टी होत असल्याचा डांगोरा पिटला जातो, चुकीच्या गोष्टींबाबत सभासदांची भूमिका जाणून घेऊन प्रत्येक तालुक्यात एक वार्षिक सभा व नाशिक येथील वार्षिक सभेला प्रत्येक सभासदाची उपस्थिती यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मेळाव्यास आदिवासी सेवक शंकरराव मराठे, बाबूराव पगार, कारभारी पगार, अॅड. परशुराम पगार, कारभारी वाघ, विठोबा बोरसे, यादवराव पवार, राजेंद्र भामरे, हर्षवर्धन पवार, यशवंत देशमुख, मोतीराम गुंजाळ, मुरलीधर पगार, अॅड. संजय पवार, मधुकर पगार, प्रभाकर पाटील, त्र्यंबक रौंदळ, व्यंकट जाधव, विनोद खैरनार, महेंद्र पवार, कृष्णा बच्छाव, सुधाकर पगार, पांडुरंग पाटील, हेमंत बोरसे, बाजीराव खैरनार उपस्थित होते.