निवडणुकांमुळे छपाई व्यवसाय येणार तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:43 IST2019-09-30T00:43:06+5:302019-09-30T00:43:31+5:30
कोणत्याही निवडणुकीत जनसंपकर् ासाठी पत्रकबाजी हे सर्वांत प्रभावी माध्यम ठरत असल्याने या विधानसभा निवडणुकीतही इच्छुक उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियासह पत्रकबाजीलाही प्राधान्य दिले जात आहे.

निवडणुकांमुळे छपाई व्यवसाय येणार तेजीत
नाशिक : कोणत्याही निवडणुकीत जनसंपकर् ासाठी पत्रकबाजी हे सर्वांत प्रभावी माध्यम ठरत असल्याने या विधानसभा निवडणुकीतही इच्छुक उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियासह पत्रकबाजीलाही प्राधान्य दिले जात आहे. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने इच्छुकांकडून छापखान्यांमध्ये मजकूर व छपाईचे नियोजनही केले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून छपाई व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत दिसून येत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रित प्रचार साहित्याला मागणी वाढणार असल्याने छपाई व्यवसाय तेजीत येणार आहे. उमेदवारी अर्जदाखल करण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना पक्षचिन्हाचे वाटप होताच निश्चित झालेला मजकूर व पक्षचिन्हांच्या छपाईसाठी छापखाने सुरू होणार आहे. यात प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांचेच काम अधिक असल्याचे छापखाने चालकांकडून सांगितले जात आहे.