वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी- पिंपळगाव रस्त्यावरील टाइम मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून चार संशयितांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० हजार ३६० रु पयांचा ऐवजही जप्त करण्यात आला.दुसऱ्या एका घटनेत अवनखेड परिसरात बेकायदेशीर देशी व विदेशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे व पथकाने पाळत ठेवली. त्यादरम्यान संशयित जीप (क्र.एमएच १५ एएच १६७६) जात असताना पथकाने ते अडवले. त्या वाहनाची तपासणी केली असता १ लाख ४८ हजार ४४० रु पयांचे मद्य व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा २ लाख ९८ हजार ४४० रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला असुन कचरु बबन सोणवणे (रा. शिवाजीनगर, दिंडोरी) रतन रामा गुंबाडे (रा. पिंपळगाव धूम) यांना अटक करण्यात आली आहे.
वणीला मटका अड्ड्यावर छापा; चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 22:37 IST
वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी- पिंपळगाव रस्त्यावरील टाइम मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून चार संशयितांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० हजार ३६० रु पयांचा ऐवजही जप्त करण्यात आला.
वणीला मटका अड्ड्यावर छापा; चौघे ताब्यात
ठळक मुद्दे१ लाख ४८ हजार ४४० रु पयांचे मद्य जप्त