चिंचवे शिवारात अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:48 IST2018-12-14T17:48:45+5:302018-12-14T17:48:57+5:30

मालेगाव : देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मल्हार हॉटेल पाठीमागे कन्हेर नाल्यात मोकळ्या जागेत अंक आकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना विशेष पोलीस पथकाने छापा टाकून अटक केली.

Print at the spot in Chinchave Shivar | चिंचवे शिवारात अड्ड्यावर छापा

चिंचवे शिवारात अड्ड्यावर छापा

मालेगाव : देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मल्हार हॉटेल पाठीमागे कन्हेर नाल्यात मोकळ्या जागेत अंक आकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना विशेष पोलीस पथकाने छापा टाकून अटक केली. त्यांच्या ताब्यातून जुगाराची रक्कम १५ हजार ९३० रुपये, दहा भ्रमणध्वनी संच, पाच दुचाकी असा एकूण एक लाख ३१ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विशेष पोलीस पथकातील उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, हवालदार ठोके, पोलीस नाईक भिलावे, शरद देवरे, पोलीस कर्मचारी महारू माळी, किरण दासरवार यांनी बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.
पोलिसांनी शिवमन मनाजी गोधडे (४३) रा. चांदवड, रत्नाकर रमेश धुमाळ (३९), देवेंद्र भाऊसाहेब बागुल, रा. चांदवड तिघे अंक आकडे लिहिणारे, खंडू दत्तू शिरसाठ, संदीप बाळू माळी, दोघे रा. देवळा, सुभाष श्रावण वाघ, रा. सौंदाणे, दिनेश गंगाराम पाटील, दादाजी मोतीराम गांगुर्डे, रा. चिंचवे, बापू श्रीधर अहिरे, राजेंद्र नथु सागर यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title: Print at the spot in Chinchave Shivar