भारतनगरमधील कत्तलखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:45 IST2017-12-31T00:43:39+5:302017-12-31T00:45:12+5:30
नाशिक : शासनाने गोवंश हत्येस बंदी घातलेली असताना शहरात सुरू असलेल्या मांसविक्रीच्या माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने भारतनगरमधील कत्तलखान्यावर शनिवारी (दि़३०) सकाळी छापा टाकून बैलांची कत्तल करणाºया दोन कसायांना ताब्यात घेतले़ त्यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६४ हजार ८०० रुपये किमतीचे मांस व चामडे जप्त करण्यात आले आहे़

शहरात गोवंश मांस मोठ्या प्रमाणात विक्री होत असून ते वडाळारोडवरील भारतनगरमधून पुरविले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजेच्या सुमारास पत्र्याचे शेड असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला़ यावेळी संशयित रफिक जाफर कुरेशी (५० रा.म्हाडा बिल्डिंग, इंदिरानगर) व शैबाज बशिर कुरेशी (२३ रा.गुलशननगर,वडाळागाव) हे गोवंशाची कत्तल करताना आढळून आले़
पोलिसांनी या दोघा संशयितांच्या ताब्यातून मांस आणि जनावरांचे कातडे असा ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़