गंगापूररोड परिसरातील अनैतिक व्यवसायावर छापा

By Admin | Updated: February 8, 2017 01:09 IST2017-02-08T01:09:19+5:302017-02-08T01:09:30+5:30

गंगापूररोड परिसरातील अनैतिक व्यवसायावर छापा

Print on immoral business in Gangapur Road | गंगापूररोड परिसरातील अनैतिक व्यवसायावर छापा

गंगापूररोड परिसरातील अनैतिक व्यवसायावर छापा

नाशिक : ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गंगापूर पोलिसांनी सोमवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ पोलिसांनी व्यवसाय चालविणाऱ्या दोघांसह दोन ग्राहकांना अटक केली असून, दोन महिलांची सुटका केली आहे़ या प्रकरणी चौघा संशयितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़  गंगापूररोडवरील आयडीबीआय बँकेच्या मागे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटमध्ये असलेल्या ‘अ‍ॅक्वम स्पा’मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांना मिळाली होती़ त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या स्पावर छापा टाकला असता संशयित सूरज मनीष शहा व कुणाल रव्ांींद्र जोशी हे दोन उत्तर भारतीय महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत होते़
पोलिसांनी या दोन्ही महिलांची सुटका करून मसाजच्या नावाखाली आलेले गिऱ्हाईक चिन्मय भरत तांबट (रा. रामवाडी, आदर्शनगर, पुष्पक अपार्टमेंट, नाशिक) व सचिन भगवान पोरजे (रा. वडनेर दुमाला, नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले. या संशयितांकडून पोलिसांनी ९ हजार ५०० रुपये रोख व साहित्य जप्त केले असून, स्पा चालक शहा व जोशी या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ गंगापूररोडवरील उच्चभू वसाहतीत अनेक दिवसांपासून अनैतिक व्यवसायाचे प्रकार वाढील लागल्याची तक्रार होती. (प्रतिनिधी)

Web Title: Print on immoral business in Gangapur Road