राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 02:03 PM2024-01-12T14:03:31+5:302024-01-12T14:16:58+5:30

जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

Prime Minister Narendra Modi started his speech in Marathi in nashik | राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. माझे भाग्य आहे की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीसाठी नाशिक येथे आलो आहे. भारत की नारी शक्ती राजमाता जिजाऊ यांचीही आज जयंती आहे. जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात केली. नरेंद्र मोदी मराठीतून बोलताच एकच जल्लोष झाला. 

PM मोदींच्या खांद्यावरची शाल खाली पडणार, इतक्यात CM शिंदेंनी...; पाहा पुढे काय घडलं!

जिजाऊ यांच्या नारीशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला घडविले. देवी अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक, विर सावरकर यांनी या भूमिने घडविले. पंचवटीत श्रीरामही येऊन गेले, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. नरेंद्र मोदींचे नाशकात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

मागील सरकारपेक्षा जास्त वेगाने काम सध्याचे सरकार करत आहे, असं कौतुकही नरेंद्र मोदींनी केले. तसेच वंदे भारत जोरात सुरू आहे. भारतातील विमानतळं आधुनिक पद्तीने तयार करण्यात आले आहे. जगाच्या विमानतळांबरोबर त्यांची गणना होत आहे. देशात नवी एनआयटी, आयआयटी तयार केल्या. विदेशात जाणाऱ्यांना प्रशिक्षणं दिले. मेड इन इंडिया, फायटर प्लेन, तेजस आकाशाची उंची गाठत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले. शिक्षण, रोजगार, स्टार्ट अप, स्पोर्टस या सर्व क्षेत्रात युवकांसाठी एक सिस्टिम तयार होत आहे. युवकांसाठी आधुनिक इको स्किल सिस्टिम तयार होत आहे. युवकांच्या ताकदीची झलक सारं जग पाहतय. १० वर्षात  युवकांना विविध संधी दिल्या. अनेक युवकांना फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, युके सारख्या देशांशी संपर्क करून युवकांसाठी नव्या संधी प्राप्त करून दिल्या जात आहे, अशी माहिती देखील नरेंद्र मोदींनी यावेळी दिली. 

दरम्यान, प्रत्येकाला जीवनात वेगळी संधी असते. आजही मेजर ध्यानचंद यांना लक्षात ठेवले जाते. भगतसिंह, चंद्रशेखर आझाद यांची आठवण ठेवतो. त्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना पळविले. महात्मा फूले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणात मोठी क्रांती केली. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी देशासाठी अहोरात्र काम केले. ते देशासाठीच जगले. त्यांनी देशासाठीच संकल्प केले. देशाला नवी दिशा दिली. आता ही जबाबदारी युवकांवर आहे. देशातील युवांमध्ये सामथ्य' आहे. भारतातील ही युवकांची पिढी सर्वात भाग्यवान आहे. भारताचे युवा हे लक्ष पूर्ण करतील, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. 

Web Title: Prime Minister Narendra Modi started his speech in Marathi in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.