शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

पंतप्रधान मोदी हेच राष्ट्रीय आपत्ती : शरद पवार यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:57 AM

चार राज्यांतील निवडणूक निकालामुळे देशातील जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळून चुकला असून, येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे,

नाशिक : चार राज्यांतील निवडणूक निकालामुळे देशातील जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळून चुकला असून, येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे, त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जाण्याची व निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीती व्यक्त करून राष्टÑवादीचे नेते, खासदार शरद पवार यांनी सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले मोदी ही देशापुढील राष्टÑीय आपत्ती असल्याची घणाघाती टीका केली.  नाशिक लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते.  पवार म्हणाले, आजवर झालेल्या निवडणुकांचा विचार करता ही निवडणूक खºया अर्थाने परिवर्तन घडविणारी असून, निवडणूक यंत्रणेवर आपली शंका नाही, मात्र केंद्र व राज्य सरकाराच्या भूमिकेबाबत आत्तापासून संशय येऊ लागला आहे. या आरोपाच्या प्रीत्यर्थ पवार यांनी भंडारा येथील पोटनिवडणूक व मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात झालेल्या घोळाचा दाखला देऊन पुढील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरउपयोग होण्याची भीती व्यक्त केली. देशासाठी त्याग, शौर्य व सर्वस्वीपणाला लावणाºयांचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्र भारतीय जनता पक्षाने सुरू केला असल्याचा आरोप करून पवार यांनी पुलवामा घटनेनंतर सर्वच विरोधी पक्षप्रमुखांची सरकारने बैठक बोलविली त्यावेळी साºयांनीच युद्धजन्य परिस्थितीत सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला व सैन्यदलाला मोकळीक देण्यात आली. त्यानंतर सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवून दिले. परंतु या घटनेचे भाजपाने भांडवल करून गावोगावी झेंडे नाचवायला सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले. कष्ट कोणी केले, शौर्य कोणी बजावले आणि छाती कोण बडवतो? असा सवाल यांनी केला.सत्तेत असताना साडेचार वर्षांत नोटबंदी करून काळापैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले, रोजगार निर्मिती, शेतमालाला दीडपट हमीभाव अशी अनेक आश्वासने सरकारने दिली, परंतु यापैकी काहीच झाले नाही, भ्रष्टाचार बंद करणार होते, तर राफेलच्या निमित्ताने तोदेखील उघड झाला, हमीभाव शेतकºयांना मिळाला नाही, कर्जमाफी न देता, शेतकºयांना दररोज १७ रुपये देऊन त्यांची कुुचेष्टा केली असल्याची टीका करून शरद पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या माजी पंतप्रधानांना बेईज्जत करण्यासाठी एका घराण्यावर खालच्या भाषेत टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याच घराण्याने देशाचा इतिहासच नव्हे तर भूगोल बदलण्याची ताकद दाखवून देतानाच दोन पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान दिले, त्याचा त्यांना विसर पडला आहे. यातून मोदी यांची संकुचित विचारसरणी दिसून येत असून, जर देशाच्या पंतप्रधानांचे विचार संकुचित असतील तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही, अशी भीती व्यक्त केली. देशाचे भवितव्याचा विचार करून सर्व विरोधी पक्ष त्यासाठीच एकत्र येत असून, सध्याच्या सरकारकडेच पुढची पाच वर्षे सत्ता दिल्यास देशातील जनतेला लोकशाहीचा अधिकार राहणार नाही व हुकूमशाहीचा उदय होईल. त्यामुळे मोदी नावाची देशापुढील राष्ट्रीय आपत्ती निवडणुकीत घालवून देशाला मुक्त करा, असे आवाहनही शेवटी शरद पवार यांनी केले.दत्तक नाशिकवर मुख्यमंत्र्यांनी कायम अन्यायच केल्याचे सांगून भुजबळ यांनी महाराष्टÑाचे पाणी गुजरातला देण्याचा घाट घालणे, नाशिक-पुणे रेल्वे, बोटक्लब, कलाग्राम, स्मार्टसिटीची आदी कामे बंद केली, असा आरोप करून नाशिक दत्तक घेतले तर आॅक्सफर्ड इकॉनॉमीमध्ये आमच्या काळात १६व्या क्रमांकावर असलेले नाशिक आता नावदेखील घेतले जात नाही तर स्मार्ट सिटीत नाशिकचा क्रमांक खाली का घसरला? असा सवाल केला.प्रारंभी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, कोंडाजी मामा आव्हाड, डॉ. अपूर्व हिरे, आदिंनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, हेमंत टकले, माजीमंत्री प्रशांत हिरे, भगीरथ शिंदे, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, बापू भुजबळ, कैलास कमोद, आदी उपस्थित होते.लबाडा घरचं आवतणंआपल्या भाषणात पवार यांनी कांद्याच्या प्रश्नाला हात घातला, त्याचवेळी एका शेतकºयाने उठून आपली व्यथा सांगायला सुरुवात केली व कांदा विक्रीचे अनुदान मिळाले नसल्याचे तसेच दोन हजार रुपये किसान योजनेचे खात्यात जमा करून पुन्हा काढून घेतल्याचे सांगितले. त्यावर शरद पवार यांनी, कांदा व द्राक्षाला किंमत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही अशा वेळी ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार शेतकºयांसाठी निव्वळ योजनांची घोषणा करीत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही असे सांगून ‘लबाडा घरचं आवतण जेवल्याशिवाय खरं मानू नका’ असे आवाहनही केले.समीरमुळे आज जिवंत - छगन भुजबळकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मी तुरुंगात आजारी असताना समीर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच जीवंत राहू शकलो, असा गौप्यस्फोट केला, पण त्याचवेळी शरद पवार यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले तेव्हाच छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर पडला, असे सांगून कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. देशाने आजवर अनेक लढाया लढल्या, परंतु त्याचा राजकीय अभिनिवेश दाखविला नाही, परंतु सैनिकांच्या मृत्यूचे व त्यांनी गाजविलेल्या शौर्याचे भांडवल भारतीय जनता पक्ष करीत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. पुलवामा घटनेच्या दिवशी मोदी व शहा राजकीय भाषणबाजीत गर्क असताना राहुल गांधी यांनी संकटाच्या काळात आपला पक्ष सरकारसोबत असल्याची घोषणा केली, तर प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद रद्द करून आपल्या राजकीय परिक्वतेचे दर्शन घडविले, असे सांगून भाजपाच्या काळातच सैन्यावर सर्वाधिक हल्ले झाल्याचा आरोपही त्यांनी केला.मग, कुलभूषण जाधव का सुटला नाही?विंग कमांडर अभिनंदन याची सुटका म्हणजे पाकची शरणागती व मोदींची मुत्सद्देगिरीचा डंका भाजपावाले पिटत आहेत, इमरान खान घाबरला, असे सांगितले जात आहे. जर इमरान खरोखरच तुम्हाला घाबरला असेल तर गेल्या दोन वर्षांपासून पाकच्या कैदेत असलेला कुलभूषण जाधव का सुटत नाही? असा सवाल करून भुजबळ यांनी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन १९७१ मध्ये जिनिव्हा करारानुसार ९९ हजार पाकिस्तानी कैद्यांना पुन्हा पाकच्या हवाली केले होते याची आठवण करून दिली व या करारानुसारच विंग कमांडर अभिनंदनची सुटका झाल्याचे सांगून भाजपा फुकटचे श्रेय घेत असल्याची टीका केली.आता वाघाने कमळीचा मुका का घेतलाआपल्या भाषणात भुजबळ यांनी शिवसेनेवरही टीका केली. ‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’, ‘वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’, ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत, असा सवाल त्यांनी केला. सरकारमध्ये सर्व निर्णय एकमताने होत असतात त्यामुळे महाराष्टÑाचे जे काही वाईट झाले त्याला सरकारमध्ये सामील असलेली शिवसेना व उद्धव ठाकरे हेदेखील जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळ