सिन्नरमध्ये पुरोहित एकांकिका स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:00 PM2019-12-18T18:00:45+5:302019-12-18T18:01:15+5:30

सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा संस्थेच्या सिन्नर संकुलात पार पडल्या. यावेळी ‘बालपण हरवलं आहे आमचं’, ‘उंच माझा झोका’, ‘धोबीपछाड’, ‘सिकंदर’, ‘भिंग’, तसेच ‘गुंफण’ या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले.

 Priestly Eknika competition in Sinnar excited | सिन्नरमध्ये पुरोहित एकांकिका स्पर्धा उत्साहात

सिन्नरमध्ये पुरोहित एकांकिका स्पर्धा उत्साहात

Next

व्यासपीठावर नाशिक नाशिक प्रचारक मंडळाचे उपाध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, बापूसाहेब पंडित, मंगेश कुलकर्णी, अनिल करवा, एकांकिका स्पर्धा संस्था स्तर प्रमुख हेमंत देशपांडे, सहप्रमुख राजेंद्र पांडे, मुख्याध्यापक अनिल पवार, मुख्याध्यापिका माधवी पंडित, माया गोसावी, सुरेखा जेजुरकर, पर्यवेक्षक सुनील हांडे , राहुल मुळे उपस्थित होते. अभिनय करताना विद्यार्थ्यांच्या पाठांतराने स्मरणशक्तीचा विकास होतोच त्याचप्रमाणे भाषेनुरूप उच्चार करण्याची सवय आपल्याला लागते. आपले अभिनय कौशल्य विकसीत होते. विविध पात्रे साकारताना, एकमेकांना सांभाळून घेण्याने आपले संघटन कौशल्य विकसित होते असे कुलकर्णी म्हणाले. स्पर्धेचे हे ४२ वे वर्ष असून सतत ४२ वर्ष हा उपक्र म सुरू ठेवणे हे आपल्या संस्थेचे वेगळेपण आहे. थोडक्या साहित्यात प्रसंगानुरुप नेपथ्यातून वातावरण निर्मिती करतात. हे दरवर्षी पहायला मिळते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक ,पालक, यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा हा उपक्र म आहे. संजय वाघ यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा दुसाने यांनी सूत्रसंचालन तर अनिल पवार यांनी आभार मानले.

Web Title:  Priestly Eknika competition in Sinnar excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा