न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:55+5:302021-09-07T04:17:55+5:30

मुख्याध्यापिका जेजुरकर यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. पालक संघ सदस्य गोरक्ष सोनवणे यांनी शिक्षकाचे जीवनात असलेले महत्त्व प्रतिपादित केले. ...

Pride of teachers in the New English School | न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांचा गौरव

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांचा गौरव

मुख्याध्यापिका जेजुरकर यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. पालक संघ सदस्य गोरक्ष सोनवणे यांनी शिक्षकाचे जीवनात असलेले महत्त्व प्रतिपादित केले. यावेळी पालक संघातर्फे सर्व शिक्षक व सेवकांचा सन्मान करण्यात आला. माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष मारुती कुलकर्णी यांनी शिक्षकांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले. या दिवशी दहावी वर्गातील काही निवडक विद्यार्थ्यांनी अभिरूप शिक्षक बनून पहिली ते नववीपर्यंतच्या वर्गांना ऑनलाइन तासिकांच्या माध्यमातून व पीपीटी सादरीकरणाद्वारे अध्यापन केले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात हर्षल निकम, दर्शन कोळी, पीयूष कांडेकर या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रति भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन श्रद्धा जाधव व ऋचा गांडोळे यांनी केले. यावेळी योगेश वैष्णव, शंकर बेनके, प्रीती पवार, रोहिणी भाटजीरे, सुजाता बाविस्कर, आशा डहाके, सुवर्णा सानप, गायत्री देशपांडे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Pride of teachers in the New English School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.