गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By Admin | Updated: August 6, 2016 22:48 IST2016-08-06T22:45:30+5:302016-08-06T22:48:23+5:30

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Pride of Quality Students | गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मनमाड : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पुढाकारमनमाड : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा अध्यक्ष रविकिरण घोलप यांच्या
हस्ते गौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे, जिल्हाध्यक्ष गोतीस, रामदास पठाडे, खंडेराव गांगुर्डे, राजाभाऊ अहेर, आनंदा महाले, रोहिदास जाधव, विठ्ठल
बर्वे, नरहरी सोनवणे, नानाभाऊ अहेर, तालुका अध्यक्ष भीमराज काटकर, लक्ष्मण अहिरे हे उपस्थित होेते.
या मेळाव्याच्या तयारीसाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी
कामाला लागावे, असे आवाहन भानुदास विसावे यांनी केले.
यावेळी राजाभाऊ अहेर यांची महासंघाच्या राज्यकार्यकारिणी सदस्य, तर अरुण पवार यांची शहर युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन विशाल मोरे, संदीप अहिरे, सचिनराज हिरे, विश्वनाथ डोंगरे, बाबा आहेर, मिलिंद
वाघ, तुषार अहेर, जागृती अहेर
यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Pride of Quality Students