शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सामाजिक भान जपणाऱ्या मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:59 IST

सिन्नर-घोटी बायपासवर कार व दुचाकी अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो व शूटिंग काढत असताना शिर्डीतून शूटिंग आटोपून परतणारे अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी आपली कार थांबवून सामाजिक भान जपून जखमींचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड तसेच रिक्षामध्ये प्रवाशांकडून विसरलेल्या बॅगमधील दागिने व पैसे प्रामाणिकपणे परत करणाºया दोन रिक्षाचालकांचा पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़२९) एका छोटेखानी समारंभात गौरव केला़ अपघातसमयी जखमींना मदत हे आपले कर्तव्य असून, प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सिंगल यांनी यावेळी सांगितले़

नाशिक : सिन्नर-घोटी बायपासवर कार व दुचाकी अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो व शूटिंग काढत असताना शिर्डीतून शूटिंग आटोपून परतणारे अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी आपली कार थांबवून सामाजिक भान जपून जखमींचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड तसेच रिक्षामध्ये प्रवाशांकडून विसरलेल्या बॅगमधील दागिने व पैसे प्रामाणिकपणे परत करणाºया दोन रिक्षाचालकांचा पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़२९) एका छोटेखानी समारंभात गौरव केला़ अपघातसमयी जखमींना मदत हे आपले कर्तव्य असून, प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सिंगल यांनी यावेळी सांगितले़  सिन्नर-घोटी बायपासवर शनिवारी (दि़२३) रात्री आठ वाजेच्या सुमारास एका वाहनाने दुचाकी व कारला धडक दिली़ यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने कारमधील महिला त्यास रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याने येणाºया-जाणाºया वाहनांना मदतीसाठी थांबण्याचे आवाहन करीत होती़़ बहुतांशी वाहनचालक हे गाडीचा वेग कमी करून पाहून निघून जात होते तर काही फोटो व व्हिडीओ काढत होते; मात्र मदतीला कोणीही थांबत नव्हते़ याचवेळी मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उद्गीरकर हे शिर्डीहून शूटिंग आटोपून येत होते़ त्यांना अपघात दिसताच त्यांनी तत्काळ आपल्या कारचा चालक विजय जाधव यांच्या मदतीने जखमीस स्वत:च्या कारमधून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ तसेच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल तसेच पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना घटनेची माहिती दिली़  पोलीस यंत्रणेने तत्काळ प्रतिसाद दिला तसेच घोटीचे पोलीस निरीक्षक भालेराव हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदतकार्य केले़ मात्र, उशीर झाल्याने सदर व्यक्तीचा जीव वाचू शकला नसला तरी उद्गीरकर यांनी जपलेले सामाजिक भान महत्त्वाचे आहे़ त्यांच्या या कार्याची दखल घेत आयुक्त डॉ़ सिंगल यांनी गुन्हे बैठकीत उद्गीरकर व जाधव या दोघांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच रिक्षात विसरलेल्या प्रवाशांचा किमती ऐवज प्रामाणिकपणे परत करणारे भद्रकाली व पंचवटी भागातील संजय धोंगडे व राजू शिंदे हे दोन रिक्षाचालक व पोलीस मित्र राकेश वाघ यांचाही सन्मान केला़यावेळी चांगली कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला तसेच चिराग वाल्मीक या निरीक्षण गृहातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व पोलीस आयुक्तालयाने स्वीकारले़  यावेळी पोलीस उपायुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय