बागलाण तालुक्यातील कोरोनायोद्धयांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 00:02 IST2020-11-14T00:01:42+5:302020-11-14T00:02:13+5:30
भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे बागलाण तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने भाऊसाहेब देसले यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र देताना अरविंद सोनवणे. समवेत भालचंद्र बागड, शरद केदारे, महेश देवरे, लालचंद सोनवणे, प्रेरणा सावंत आदी.
औदाणे : भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे बागलाण तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शरद केदारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम भारत कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब देसले, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, मालेगाव उपविभागीय वनअधिकारी जे. एन. ऐडलावार, तहसीलदार जितेंद्रकुमार इंगळे, गटविकास अधिकारी डी. बी. कोल्हे, वीज वितरणचे बोरसे, देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र, सामाजिक कार्यकर्ते, अरविंद सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, सटाणा नगर परिषदेचे गटनेते महेश देवरे उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार शरद भामरे, संतोष जाधव, काशीनाथ हांडे, सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, वनरक्षक स्वाती सावंत, स्वप्निल बागड, स्वप्निल ठोके, अनिल सोनवणे, बापू अमृतकार, अविनाश मोरे, भास्कर पगार, सागर भामरे, सोमनाथ निंबारे यांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम भारत कार्यकारी अध्यक्ष देसले, वसंत बगडाणे, दिलीप अहिरे, विलास दंडगव्हाळ, मंगेश भामरे, रवींद्र बगडाणे, प्रेरणा सावंत, योगेश जगताप, अशोकतात्या पवार यांनी केले होते. यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रेरणा सावंत यांनी केले. आभार भाऊसाहेब देसले यांनी मानले.
.
---------------------