बागड यांच्या कार्याचा गौरव
By Admin | Updated: April 4, 2017 01:40 IST2017-04-04T01:40:09+5:302017-04-04T01:40:33+5:30
सटाणा : येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त ‘यशचंद्राचे चांदणे’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

बागड यांच्या कार्याचा गौरव
सटाणा : येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त ‘यशचंद्राचे चांदणे’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन गोव्याचे ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
येथील राधाई मंगल कार्यालयात बागड यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे औचित्य साधून बागड यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अमळनेर येथील प.पू. सद्गुरु प्रसाद महाराज, सुरत येथील उद्धव महाराज, गोव्याच्या गुरुमाता ब्रह्मीदेवी, वृंदावन येथील स्वामी रंगनादजी, वारकरी संप्रदायच्या याशोदा आक्का महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बह्मेशानंद स्वामी महाराज म्हणाले, बागलाण ही देव भूमी आहे. अधिकाऱ्याचे देऊळ असलेले एकमेव बागलाण असून, असे देवत्व प्राप्त झालेल्या यशवंतराव महाराज यांचे कार्य समाजात पोहोचविण्याचे आदर्शवत काम बागड करत असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले. महाराजांच्या मंदिराच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसाद महाराज, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनीही आपले विचार मांडले. गौरव-ग्रंथाचे संपादक शं.क. कापडणीस, उपसंपादक ब.जी.पगार यांनी बागड यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला. देवमामलेदार देवस्थान , रोटरी क्लब, बागलाण एज्युकेशन सोसायटी, वाणी समाज मंडळ, प्रसाद भक्त मंडळ, वाणी युवा मंच, ज्येष्ठ नागरिक संघ आदि संस्थांनी बागड यांचा सत्कार केला. यावेळी महेश पाटील, पुष्पलता पाटील, ज्योती जाधव, किरण दशमुखे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.