भडकले भाज्यांचे भाव

By Admin | Updated: June 1, 2017 02:00 IST2017-06-01T01:58:19+5:302017-06-01T02:00:15+5:30

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरु वारपासून (दि. १) शेतकरी संपावर जाणार आहेत

The prices of stirred vegetables | भडकले भाज्यांचे भाव

भडकले भाज्यांचे भाव

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरु वारपासून (दि. १) शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम किसान क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीकडून सुरू असून, जिल्हाभरातून सुमारे तेराशेहून अधिक गावांतील शेतकरी या संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने शहरातील नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली असून, आठवडे बाजारासह शहरातील विविध ठिकाणच्या भाजी बाजारात किमान आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करणाऱ्या गृहिणींची संख्या जास्त होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी संपाची माहिती पोहोचविण्याबरोबरच माहितीपत्रके आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून संपाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिवण्यात येत आहे. शेतात पिकणारा माल शहर परिसरात विक्र ीला जाऊ द्यायचा नाही, याची दक्षता प्रत्येक गावाने गावपातळीवरच घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या संपात गावागावांतून सहभागी झालेले शेतकरी अपवादात्मकरीत्या बाजारात येऊ पाहणाऱ्या गाड्यांनाही अडवणार आहे. त्यामुळे शहराचा भाजीपाल्याच्या पुरवठा खंडित होणार आहे. या संपाचा विचार सर्वसामान्य नाशिककरांना सतावत असताना भाजीविक्रे त्यांनी मात्र भाज्यांचे भाव वाढवून विक्री सुरू केल्याचे प्रकारही समोर आले असून, शहरात खुल्या विक्रीसाठी आलेले दूधही हातोहात संपल्याचे दिसून आले.
सर्वसामान्य ग्राहकांनी जरी दुधाचा साठा केला नसला तरी छोटे चहा टपरीवाले व्यावसायिकांनी किमान दोन दिवस पुरेल इतके दूध घेतल्याचे दिसून आले. शेतकरी संपात दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतच अनेक दूध डेअरींनीही सहभाग नोंदविल्यामुळे गुरुवारपासून शहरी भागात पिशवीबंद दुधाचाही तुटवडा निर्माण होणार आहे.
तर दोन दिवसांनी असे पिशवीबंद दूधही मिळणार नाही. त्यामुळे चहाचे टपलीवाले व दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.गुरुवारी शेतकरी संपावर जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बुधवारीच बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला. तर भाजीपाला तुटवड्याच्या भितीने व्यापाऱ्यांनीदेखील खरेदीसाठी गर्दी केली.

Web Title: The prices of stirred vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.