शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

निर्यातक्षम कांदा कमी असल्याने भावात घसरण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:23 IST

केंद्र सरकारने किमान निर्यातमूल्य शून्य केले असले तरी बाजार समितीमध्ये निर्यातक्षम कांदा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने निर्यात मंदावली आहे. आवक वाढलेली असल्यामुळे  गेल्या काही दिवसांत लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात घसरण सुरू आहे.

लासलगाव : केंद्र सरकारने किमान निर्यातमूल्य शून्य केले असले तरी बाजार समितीमध्ये निर्यातक्षम कांदा कमी प्रमा-णात उपलब्ध होत असल्याने निर्यात मंदावली आहे. आवक वाढलेली असल्यामुळे  गेल्या काही दिवसांत लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात घसरण सुरू आहे. दरम्यान भारतीय कांद्याला परदेशात चांगली मागणी असून, निर्यातही खुली असल्यामुळे शेतकºयांनी परिपक्व झालेला कांदाच बाजारात  आणावा, असे आवाहन निर्यातदार व्यापा-ºयांनी केले आहे. ५ फेब्रुवारीच्या तुलनेत लासलगावी कांदा दरात ११०० रुपयाची घसरण झाली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांबरोबरच इतर राज्यांतूनही कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारपेठेमध्ये कांद्याला मागणीही चांगली आहे. मात्र बाजारभाव घसरण्याच्या भीतीने शेतकरी अपरिपक्व कांदा बाजार समितीत आणत आहेत. या कांद्याची गुणवत्ता कमी असल्याने बाजारभाव कमी मिळत आहे. कांदा निर्यातमूल्य शून्य केले असले तरी निर्यातक्षम कांदा अल्पप्रमाणात येत आहे. त्यामुळे निर्यात कमी प्रमाणात होत आहे. भारतीय कांद्याला विदेशी बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. देशातील निर्यात पूर्णत: खुली आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाई न करता परिपक्व झालेला कांदा बाजार समितीत आणावा, असे आवाहन निर्यातदार मनोज जैन यांनी केले  आहे. २ फेब्रुवारीपासून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य शून्य केले. यामुळे निर्यातीत वाढ होऊन भाव स्थिर राहतील, अशी अपेक्षा असताना कांदा भावातील घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाही. १५ दिवसांत कांदा दरात ११०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. ५ फेबु्रवारीला सर्वसाधारण २४५० प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा रांगडा लाल कांदा आजमितीस १३५० प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. येथील बाजार समितीमध्ये लाल कांद्या- बरोबर उन्हाळ कांद्याचीही आवक सुरू झाली आहे.  शुक्रवारी लासलगाव बाजार समितीमध्ये ६०० वाहनांतून लाल कांद्याची आवक होऊन किमान १००० कमाल, १५५२ तर सरासरी १३५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला किमान ९००, कमाल १६००, तर सरासरी १३७५ रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.नांदूरशिंगोटेत कांद्याची विक्रमी आवकनांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजार आवारात शुक्र वारी (दि.२३) कांद्याची विक्र मी २५ हजार क्विंटल आवक झाली होती. मात्र बाजारभावाच्या तुलनेत येथे भावात दोनशे ते अडीचशे रु पयांची घसरण झाली. कांद्यास सरासरी प्रतिक्विंटल १४०० रुपयांच्या आसपास भाव मिळाला. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रूक येथे उपबाजार आवार आहे. नांदूरशिंगोटे येथे आठवड्यातून सोमवार व शुक्र वार तसेच दोडी येथे बुधवारी कांदा लिलाव असतात. गेल्या काही महिन्यांपासून दोन्हीही ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. केंद्र सरकारने निर्यातमूल्य शून्य केल्याने कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. येथील उपबाजारात शेतकºयांना कांदा विक्र ी केल्यानंतर रोख स्वरूपात पेमेंट मिळत असल्याने पसंती आहे. आज सकाळपासूनच शेतकºयांनी उपबाजारात कांदा विक्र ीसाठी वाहनांची वर्दळ सुरू झाली होती. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उपबाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे शेड हाऊसफुल झाले होते. काही व्यापाºयांनी उर्वरित कांदा दोडी येथील उपबाजारात लिलावासाठी पाठवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत लिलाव सुरू होते. वाहनांची उपबाजार आवारात व रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. कांद्याचे भाव कमी झाल्याने येथेसुद्धा त्याचा फटका बसला. गत आठवड्याच्या तुलनेत २०० ते २५० रुपयांची भावात घसरण झाली. आज येथे ४३,५०९ च्या आसपास कांदा गोणी म्हणजे २५ हजार क्विंटल आवक होती. कांद्यास सरासरी १४०० जास्तीत जास्त १६०० व कमीत कमी २०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड