अभोण्यात कांद्याला २३०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:13 IST2021-06-02T00:13:13+5:302021-06-02T00:13:53+5:30
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात मंगळवारी (दि.१) ४९८ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे १०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २,३०० रुपये, किमान ३०० रुपये, तर सरासरी १,७०० ते १,८०० रुपये भाव मिळाला.

अभोण्यात कांद्याला २३०० रुपये भाव
ठळक मुद्देकांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात मंगळवारी (दि.१) ४९८ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे १०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २,३०० रुपये, किमान ३०० रुपये, तर सरासरी १,७०० ते १,८०० रुपये भाव मिळाला. सोमवारी (दि.३१)च्या तुलनेत मंगळवारी भावात १०० रुपयांची घसरण झाल्याने, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती.