दोडी उपबाजारात कांद्याला ३१०० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:39 IST2020-09-11T15:38:44+5:302020-09-11T15:39:29+5:30
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोडी उपबाजारात बुधवारी ३१०० रुपये क्विंंटल दराने कांद्याची विक्री झाली.

दोडी उपबाजारात कांद्याला ३१०० रुपये दर
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोडी उपबाजारात बुधवारी ३१०० रुपये क्विंंटल दराने कांद्याची विक्री झाली. कांद्याला सरासरी २४०० रुपये दर मिळाल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली. दोडी उपबाजारात गोणी कांद्याचे लिलाव होतात. बुधवारी ८७७२ गोण्यांतून सुमारे ४९१० क्विंटल कांदा विक्रीस आला होता. कमीतकमी २०० रुपये, जास्तीतजास्त ३१०० रुपये, तर सरासरी २४०० रुपये क्विंटल दराने कांदा विकला गेला.