पंधरा लाखांच्या लुटीचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST2021-02-07T04:15:05+5:302021-02-07T04:15:05+5:30

जुन्या भांडणाचा काढला वचपा रोलेट नावाचा जुगार चालविणारा इसम कैलास शहा याच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरत, संशयित ...

Pretend to be a loot of fifteen lakhs | पंधरा लाखांच्या लुटीचा बनाव

पंधरा लाखांच्या लुटीचा बनाव

जुन्या भांडणाचा काढला वचपा

रोलेट नावाचा जुगार चालविणारा इसम कैलास शहा याच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरत, संशयित भालेराव व त्याच्या मित्रांनी संगनमताने शहा याच्याशी वचपा काढण्यासाठी त्याने दिलेली १५ लाखांची रक्कम लांबविण्याचा कट रचल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी १५ लाखांची रोकड जप्त केली आहे. शहा यांचे बांधकाम व्यवसायातील भागीदार संदीपसिंग सलोजा यांनी दिलेली रक्कम १५ लाखांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी हे करीत आहेत.

---इन्फो--

२४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी पोलीस निरीक्षक के.टी. राैंदळे, सहायक निरीक्षक साजिद मन्सुरी व गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरविली. घटनास्थळावरील पंचनामा, तसेच मोटारीची तोडफोड आदी बाबींची सूक्ष्म तपासणी करत, पोलिसांनी २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश केला.

Web Title: Pretend to be a loot of fifteen lakhs