अध्यक्ष घेणार टंचाईचा ‘मागोवा’ १ जुलैला टंचाई आढावा बैठकीचे आयोजन

By Admin | Updated: June 28, 2014 01:49 IST2014-06-28T01:38:07+5:302014-06-28T01:49:27+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जिल्'ातील भीषण टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी साठा जपून वापरण्याचे आदेश दिले

The president will take part in the scarcity review meeting on July 1 | अध्यक्ष घेणार टंचाईचा ‘मागोवा’ १ जुलैला टंचाई आढावा बैठकीचे आयोजन

अध्यक्ष घेणार टंचाईचा ‘मागोवा’ १ जुलैला टंचाई आढावा बैठकीचे आयोजन

  नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जिल्'ातील भीषण टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी साठा जपून वापरण्याचे आदेश दिलेले असतानाच आता जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री नितीन पवार यांनी १ जुलै रोजी टंचाईसंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत टंचाई बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील जुन्या सभागृहात १ जुलै रोजी दुपारी २ वाजता ही टंचाई आढावा बैठक जयश्री पवार यांनी आयोजित केली आहे. विशेष म्हणजे आढावा बैठकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी केलेला असतानाच या टंचाईच्या आढावा बैठकीस जयश्री पवार यांनी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह सभापती राजेश नवाळे, ज्योती माळी, सुनीता अहेर,अलका जाधव यांनाही या आढावा बैठकीस बोलविले आहे. तसेच खातेप्रमुखांना संपूर्ण माहितीनीशी बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना जयश्री पवार यांनी दिल्या आहेत. या बैठकीला कोणत्याही खातेप्रमुखाने पूर्व परवानगीशिवाय टंचाईच्या बैठकीस अनुपस्थित राहू नये,असे आदेशच पवार यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The president will take part in the scarcity review meeting on July 1