अध्यक्ष- उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारला
By Admin | Updated: March 28, 2017 01:41 IST2017-03-28T01:41:20+5:302017-03-28T01:41:35+5:30
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व उपाध्यक्ष नयना गावित यांनी त्यांचा पदभार सोमवारी (दि.२७) दुपारी स्वीकारला.

अध्यक्ष- उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारला
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व उपाध्यक्ष नयना गावित यांनी त्यांचा पदभार सोमवारी (दि.२७) दुपारी स्वीकारला. यावेळी शिवसेना व कॉँग्रेसचे नेते तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील शहीद जवान संदीप ठोक यांच्या मातोश्री विमल सोमनाथ ठोक यांना जिल्हा परिषदेच्या सेसमधून २१ हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला. याचवेळी जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्ष कैलास वाकचौरे यांनीही २१ हजारांचा चेक विमल ठोक यांना प्रदान केला. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार निर्मला गावित, अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर, अनिलकुमार अहेर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी जि. प. उपाध्यक्ष संपतराव सकाळे, दिगंबर गिते, जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार, नितीन पवार, अमृता पवार, उदय जाधव, भास्कर गावित, बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, माजी सदस्य प्रशांत बच्छाव, प्रवीण जाधव, सिन्नर नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, प्रितीश छाजेड आदि उपस्थित होते. प्रास्ताविक धनराज महाले यांनी केले, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी मानले. (प्रतिनिधी)