आई-वडिलांच्या स्मृती झाडाच्या रूपात जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:50+5:302021-09-24T04:15:50+5:30

वावी : कुटुंबातील एखादी व्यक्ती अथवा आई-वडील जर मरण पावले तर त्यांची रक्षा नदीपात्रात न टाकता शेतात खड्डा घेऊन ...

Preserve the memory of parents as a tree | आई-वडिलांच्या स्मृती झाडाच्या रूपात जपा

आई-वडिलांच्या स्मृती झाडाच्या रूपात जपा

वावी : कुटुंबातील एखादी व्यक्ती अथवा आई-वडील जर मरण पावले तर त्यांची रक्षा नदीपात्रात न टाकता शेतात खड्डा घेऊन तेथे एक झाड लावावे व ती रक्षा त्या खड्ड्यात टाकून पाणी घालावे. जसजसे झाड उंच उंच होईल, तसतसे आपल्या आई-वडिलांची आठवण स्मरणात राहील. त्यामुळे आई-वडिलांचे स्मरण ठेवण्यासाठी एक तरी झाड लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील वावी येथे जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने कोरोनाचे नियम पाळून समाजप्रबोधन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे बाजारतळाच्या मोकळ्या मैदानावर आयोजन केले होते. त्याप्रसंगी इंदोरीकर महाराज बोलत होते. व्यासपीठावर कीर्तन केसरी पांडुरंग महाराज गोसावी, माजी सरपंच विजय काटे, सरपंच कन्हैयालाल भुतडा, सदस्य प्रशांत कर्पे, कैलास जाजू, प्रदीप मंडलिक, श्रीकृष्ण गोसावी महाराज, महेश्वर भगुरे गुरुजी, किरण महाराज शेटे, रोहिदास महाराज जगदाळे, श्रीहरी महाराज भगुरे, दीपक महाराज खरात आदी उपस्थित होते.

पर्यावरणाचा ढासाळलेला तोल सांभाळण्यासाठी प्रत्येक घरासमोर एक तरी झाड लावले पाहिजे. त्याचबरोबर नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तिचे रक्षण करणे ही आपलीच जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वितेसाठी गोविंद कवाडे, राहुल खांबेकर, संतोष घेगडमल, प्रशांत कर्पे, गोरख पवार, अक्षय खर्डे, श्रीकांत पवार, आशिष विधाते, किशोर कवाडे, अनिकेत पाटील, अभिजित मंडलिक, विकास गायकवाड, प्रमोद काटे आदींनी परिश्रम घेतले.

-------------------------

संतांशिवाय मानव जातीला आधार नाही

ज्येष्ठ नागरिकांपासून युवक व युवतींना इंदोरीकर महाराजांनी मार्गदर्शन केले. आई, वडील व संत परंपरेशिवाय दुसरा कुठलाही मानव जीवनाला आधार नाही, याचे ज्ञानेश्वरीच्या ओव्यातून दृष्टांत देऊन उदाहरणे दिली.

----------------------

सिन्नर तालुक्यातील वावी येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचा सत्कार करताना गोविंद कवाडे, राहुल खांबेकर, संतोष घेगडमल, अक्षय खर्डे, श्रीकांत पवार, प्रमोद काटे, अनिकेत पाचपाटील, आशिष विधाते, गोरख पवार आदी. (२३ वावी इंदोरीकर)

230921\23nsk_10_23092021_13.jpg

२३ वावी इंदोरीकर

Web Title: Preserve the memory of parents as a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.