महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर

By Admin | Updated: February 21, 2015 01:49 IST2015-02-21T01:49:09+5:302015-02-21T01:49:37+5:30

महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर

Presenting the financial year 2015-16 financial year for the municipal corporation | महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर

महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर

नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर करताना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील जुन्या मिळकतींवर कराचा बोजा न टाकता नव्याने विकसित होणाऱ्या मिळकतींसाठी प्रचलित बाजारमूल्यानुसार (रेडिरेकनर) घरपट्टी आकारणीची शिफारस केली असून, एकूणच पाणीपट्टीत पहिल्या वर्षासाठी सुमारे ३० टक्के दरवाढ सुचविली आहे. त्याचबरोबर महापालिका औद्योगिक वसाहतींमध्ये सेवा-सुविधा पुरवत असल्याने कारखान्यांसाठीही करात दरवाढ प्रस्तावित केली आहे. महापालिकेला यामुळे सुमारे आठ कोटी ५० लाख रुपये वाढीव उत्पन्न अपेक्षित आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांना अंदाजपत्रक सादर केले. आयुक्तांच्या या अंदाजपत्रकानुसार, नवीन मिळकतींसाठी करआकारणीचे दर सुधारित बाजारमूल्यांनुसार प्रतिचौरस फुटाप्रमाणे आकारले जाणार आहे. आर.सी.सी. बांधकामांसाठी शहरी भागात सध्या निवासी दर ५० पैसे प्रति चौ. फूट असून, बाजारमूल्यानुसार तो पाच प्रकारच्या श्रेणीनुसार ५३ ते ८२ पैसे प्रति चौ. फूट इतका आकारला जाणार आहे. कौलारू घरांसाठी ३३ ते ६२ पैसे आणि व्यावसायिक व औद्योगिक मिळकतींसाठी सुमारे तीन रुपये प्रति चौ. फूट दर आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे.
या नवीन मिळकतींच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे ५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. सर्व्हे नंबरनुसार बाजारमूल्याचे दर आणि महागाई निर्देशांक लक्षात घेऊन मालमत्ता करातील असमोतल दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने १९९९ पासून घरपट्टीत वाढ केली नसल्याने उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी ही करवाढ प्रस्तावित केली आहे. आयुक्तांनी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ८० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.
याशिवाय आयुक्तांनी अंदाजपत्रकात सर्व मिळकतींसाठी पाणीपट्टीतही पहिल्या तीन वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने वाढ सुचविली आहे. आयुक्तांनी आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. सध्या घरगुती पाणीपुरवठ्यासाठी हजार लिटर्ससाठी पाच रुपये पाणीपट्टी आकारली जाते. सन २०१५-१६ या वर्षासाठी घरगुती पाणीपट्टीत हजार लिटर्ससाठी दीड रुपयांनी वाढ सुचविली असून, पहिल्या वर्षी ६.५० रुपये, सन २०१६-१७ या वर्षासाठी ७ रुपये आणि सन २०१७-१८ या वर्षासाठी ७.५० रुपये दरवाढ सुचविण्यात आली आहे. बिगर घरगुतीसाठी हजार लिटर्ससाठी सध्या २२ रुपये दर असून, तो पहिल्या वर्षी २७ रुपये असेल.

Web Title: Presenting the financial year 2015-16 financial year for the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.