प्रेसिडेन्ड कलर्स : ‘कॅटस्’च्या हवाई कसरतींमध्ये ‘रूद्र’ प्रथमच घेणार सहभाग
By अझहर शेख | Updated: October 9, 2019 17:00 IST2019-10-09T16:57:25+5:302019-10-09T17:00:06+5:30
भारतीय वायुसेनेत दाखल झालेले अत्याधुनिक ‘रूद्र’ हेलिकॉप्टर अद्याप कॅटस्च्या ताफ्यात आलेले नाही. मागील काही वर्षांपासून या हेलिकॉप्टरची कॅटस्ला प्रतीक्षा आहे.

प्रेसिडेन्ड कलर्स : ‘कॅटस्’च्या हवाई कसरतींमध्ये ‘रूद्र’ प्रथमच घेणार सहभाग
अझहर शेख,
नाशिक : चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरसोबत अत्याधुनिक एचएएल बनावटीचे लढाऊ ‘रूद्र’ हेलिकॉप्टरदेखील ‘प्रेसिडेंट कलर्स’ सोहळ्याच्या निमित्ताने हवाई कसरतींसाठी भरारी घेणार आहे. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅटस्) या औचित्त्यावर रूद्र दाखल झाले. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सरावादरम्यान रूद्र हेलिकॉप्टरच्या घिरट्या आकाशात नाशिककरांना पहावयास मिळाल्या.
...असे आहे ‘रूद्र’
एचएएलमार्फत निर्मित रूद्र हेलिकॉप्टर ध्रुवचा एक सशक्त प्रकार आहे. या लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती २००७ साली झाली. २०१२साली एचएएलकडून भारतीय सेनेला रूद्र हस्तांतरीत केले गेले. या हेलिकॉप्टरला पुढील बाजूने २० एम.एमची बंदूक, ७० एमएमचे रॉके ट पॉड, एन्टी टॅन्क गाइड मिसाइलसह हवेतून हवेत शत्रुवर हल्ला करणाºया मिसाइलने सुसज्ज आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे हे भारतात विकसीत केले गेलेले पहिले हेलिकॉप्टर आहे.