कळवणला अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:24 IST2020-05-11T23:12:41+5:302020-05-11T23:24:53+5:30

कळवण : तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे खडकी गाव व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात आदिवासी बांधवाच्या घरांचे पत्रे, कौल उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 Presence of unseasonal rains reported | कळवणला अवकाळी पावसाची हजेरी

कळवणला अवकाळी पावसाची हजेरी

कळवण : तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे खडकी गाव व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात आदिवासी बांधवाच्या घरांचे पत्रे, कौल उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोमवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्याच्या पश्चिम भागात वादळी वाºयासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या पावसात खडकी गावातील बहुतांशी घरावरील कौले, पत्रे उडाली असून, भिंतीही कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसाने येथील आदिवासी बांधवांच्या घरांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा संसार उघडा पडला असून, सर्व जीवनावश्यक वस्तू भिजल्या आहेत. महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांनी केली आहे. दरम्यान, ग्रामसेविका मीना भोये यांनी नागरिकांच्या घराच्या नुकसानीची पाहणी केली.

Web Title:  Presence of unseasonal rains reported

टॅग्स :Nashikनाशिक