उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 14:16 IST2018-11-02T14:16:13+5:302018-11-02T14:16:24+5:30
ओझर- पिंपळगाव बसवंत येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या शेतकरी मेळावा
ओझर- पिंपळगाव बसवंत येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजप नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. निफाड तालुक्यातील शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या मतदारसंघात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असताना सेनेने स्वबळाच्या नारा देत एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. तरही भाजपने मात्र युती होणारच असे संकेत वेळोवेळी दिले आहेत. महत्वाचे म्हणजे आपल्या वक्तव्यात युतीचा नारा तुटू न दिलेले चंद्रकांत पाटील हे ठाकरे यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर येणार असल्याने युतीबद्दल असलेले तर्कवितर्क याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.