ब्राह्मणगाव येथे मेघ गर्जनेसह पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 18:54 IST2021-02-18T18:53:31+5:302021-02-18T18:54:15+5:30
ब्राह्मण गाव : येथे गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता वादळी वारा सुरू झाला त्यानंतर मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

ब्राह्मणगाव येथे पावसाने लावलेली हजेरी.
ब्राह्मण गाव : येथे गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता वादळी वारा सुरू झाला त्यानंतर मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
या आवकाळी पावसामुळे शेतातील गहू, कांदा पिकाला फटका बसला असून या आधीचे शेतीवरील संकट निवारण होत नाही तोवर पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
मागील अवकाळी पावसामुळेही शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई शासनाकडून थोड्याफार शेतकऱ्यांना प्राप्त होऊन एकच दिवस उलटला नाही तोच पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी ही त्रस्त झाला आहे.